८ वी १२ वी ते आयटीआय पास उमेदवारांना भारतीय सैन्यात जाण्याची संधी- Indian Army Agniveer Bharti 2024

Indian Army Agniveer Bharti 2024

Indian Army Agniveer Bharti 2024: Candidates who passed 8th, 10th and ITI are open for Indian Army Recruitment. Online application is invitation from eligible candidates. The Join Indian Army website has also provided detailed information in this regard. Eligible candidates must apply by the last date. will be accepted And then in the second phase the actual recruitment meeting will take place CLOSING date for submission of recruitment application is 22 March 2024 but interested candidates should apply online before the last date. Details regarding Agniveer Bharti given below, more detailed information refer to advertisement in pdf format.

Indian Army Agniveer Bharti 2024

भारतीय सैन्यात भरती व्हायचय ? मग तुमच्यासाठी असलेली ही संधी सोडू नका भारतीय सैन्य दला अंतर्गत २०२४ – २५ साठी अग्निवीर पदाची भरती दोन टप्प्यामध्ये होणार आहे.
पहिल्या टप्प्यात संगणकावर सीईई परीक्षा होईल आणि दुसरा टप्पा प्रत्यक्ष भरती मेळावा राहील.

या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज मागविले जात आहेत.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना २२ मार्चपर्यंत मुदत आहे.

या भरतीची सविस्तर माहिती joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

उमेदवारांना वरील वेबसाईट वर स्वतःचे लोगिन करून स्वतःचे प्रोफाईल तयार करावे लागेल नोंदणी कशी करायची? आणि ऑनलाईन परीक्षेसाठी कसे उपस्थित रहावे याचे व्हिडीओ देखील उपलब्ध आहेत सैनिक भरती कार्यालयाकडून संधी देण्यात आली आहे.

या भरतीमध्ये आठवी,10 वी आणि आयटीआय झालेल्या उमेदवारांनाही देखील संधी प्राप्त आहे.

खालील लेखामध्ये तुम्ही पदाचे नाव पदांची शैक्षणिक पात्रता, व इतर आवश्यक माहिती पाहू शकता व अधिक माहितीकरिता दिलेली PDF जाहिरात वाचा.

त्यासाठी आवश्यक लिंक खाली दिल्या आहेत नोकरी अपडेट्स साठी दिलेल्या बटनावर क्लीक करून महासरकार नोकरी whats app ग्रुप ला जॉईन व्हा.

पदाचे नाव:
  • अग्निवीर जनरल ड्युटी,टेक्नीकल,लिपिक स्टोअर कीपर,ट्रेडसमेन
वयोमर्यादा:
  • 17 ते 21 वर्ष दरम्यान वय असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे. {कृपया दिलेली मूळ जाहिरात वाचावी.}
अर्ज पद्धत:
  • भरती साठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाइट द्वारे करायचा आहे.
महत्वाच्या दिनांक:
  • १३ फेब्रुवारी २०२४ या तारखेपासून अर्ज ऑनलाइन सुरू आहेत
  • २२ मार्च २०२४ अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे.
नोकरी ठिकाण :
  • संपूर्ण भारत

पदांसाठी शैक्षणिक पात्रता

अग्नीवीर जनरल ड्युटी या पदासाठी किमान ४५ % गुणांसह १० वी पास असणे आवश्यक आहे. व या पदासाठी उंची १६८ सेमी असावी.

लिपिक स्टोअर कीपर – कोणत्याही शाखेतून १२ वी ६० % गुणांसह पास. व उंची १६२ सेमी असावी. टेक्नीकल पदाकरिता१२ वी शास्त्र शाखा भौतिक रसायन आणि गणित,इंग्लिश या विषयासह ५०% गुणांसह पास असणे आवश्यक आहे व उंची १६७ सेमी लागेल .ट्रेडसमेन या पदाची पात्रतेसाठी १० वी पास असणे गरजेचे आहे आणि उंची १६८ सेमी असावी.

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

अर्ज करण्याअगोदर संपूर्ण अटी जाणून घ्याव्या
अर्ज करण्यासाठी आधी जॉईन इंडियन आर्मी अधिकृत वेबसाईट ला जावे त्यांनंतर
co/or/Agniveer Apply या लिंकवर लॉगिन विभागात जाऊन अर्ज भारायचा आहे.
अर्ज केल्यावर अर्जाचे शुल्क भरून त्याची प्रिंट डाउनलोड करून घ्यावी.अर्जाची फी रुपये २५० इतकी आहे.अर्जाची फी भरल्यानंतरच अर्ज पूर्णपणे सबमिट होईल.

PDF जाहिरातपाहण्यासाठी इथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जअर्ज करा
निवड प्रक्रिया:

भरतीचे टप्पे पुढील प्रमाणे असणार आहे त्यात अगोदर परीक्षा घेतली जाईल व त्यामध्ये पास झालेले उमेदवार शारीरिक चाचणी साठी पात्र ठरतील शारीरिक चाचणी नंतर कागदपत्रे पडताळणीची प्रक्रिया असेल त्यानंतर मेडिकल होईल.

या सर्व प्रक्रियेतून उमेदवारांची कामागीरी पाहून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल व त्याप्रमाणे उमेदवाराची निवड केली जाईल.

सर्व पदाकरिता नियम
वय ३१.१०.२०२४ रोजी १७ ते २१ वर्षे दरम्यान असावे.
वजन – ५० किलो.
छाती – ७७ से.मी. + ०५+ सेमी विस्तार

शरीर कार्यक्षमता चाचणी

१. ५ मिनिटे ३० सेकंद ते ५ मिनिटे ४५ सेकंदात १.६ किलोमीटर धावणे.
बीम वर खेचणे
९ फुट खड्ड्यात उडी मारणे
बॅलन्सीग बीम मध्ये चालणे आवश्यक राहील.

  • नोकरी विभाग- भारतीय लष्कर
  • भरतीचे नाव – अग्निपथ भरती
  • पदाचे नाव अग्निवीर
  • एकूण पदांची संख्या अंदाजे २५,०००
  • पगार रु.३००००/- ४००००/-
  • नोकरी स्तर – राष्ट्रीय
  • अर्जाची पद्धत -ऑनलाईन
इतर भरती पहा

जिल्हानिहाय पोलीस भरतीच्या जाहिराती

AAI मध्ये 490 पदे नोकरीची संधी

तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment