पुणे महानगरपालिकेत रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज सुरू | Pune Mahanagarpalika Bharti 2024

Pune Mahanagarpalika Bharti 2024

Pune Mahanagarpalika Bharti 2024 : मागील वर्षी 135 कनिष्ठ अभियंता पदाकरिता भरतीची प्रक्रिया महापालिकेद्वारे राबविली होती त्यासाठी तीन वर्ष अनुभवाची अट असताना देखील सुमारे 12 हजार 500 अर्ज प्राप्त झाले होते हे भरतीची प्रक्रिया पूर्ण होऊन त्याची प्रतीक्षा यादी ची मुदत नुकतीच संपली त्यानंतर आता 113 रिक्त जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे महापालिकेने कनिष्ठ अभियंताच्या पदाकरिता भरती सुरू केली असून आता ऐकून 113 रिक्त पदांची भरती होणार आहे यापैकी 13 पदे हे माजी सैनिक अनुशेष भरून करण्यासाठी ठेवली आहे व सर्व संवर्गातील शंभर पदे भरले जाणार आहे.
आज दिनांक 16 जानेवारीपासून 2024 पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया उपलब्ध झाली आहे.

Pune Mahanagarpalika Bharti 2024

सदर भरती ही सरळसेवेद्वारे राबविली जाणार आहे इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल,त्यासाठी महत्त्वाच्या लिंक खाली दिल्या आहेत अर्जदार दिलेल्या खाली लिंक वरून अर्ज करू शकतात व भरतीची अधिक माहिती पीडीएफ द्वारे जाणून घेऊ शकता पीडीएफ पाहण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करा. इच्छूक उमेदवारांनी शेवटच्या तारखे आधी करावा अर्जाची शेवट तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे. अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता,वेतन श्रेणी,वय मर्यादा व इतर सर्व महत्वाचे तपशील खाली दिले आहेत.

पदाचे नाव:
 • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
एकूण पदे :
 • 113
वयोमर्यादा:
 • उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्ष असावे व इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्ष वयाची सूट देण्यात आली आहे. व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्ष वयाची सूट देण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
 • अर्ज ऑनलाइन पद्धतीने अधिकृत संकेत स्थळावर करायचा आहे. खालील लिंक वर क्लिक करून थेट अर्ज करू शकता.
अर्ज फी:
 • अर्जासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना रु.1000/- इतके शुल्क आकारले जाणार असून मागास प्रवर्गातील उमेदवारांना व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांना रु 900/- इतके शुल्क भरावे लागेल.
 • परीक्षा फी ऑनलाइन चालनाची प्रत ऑनलाइन अर्ज केलेल्या प्रतिसहित व कागदपत्रे तपासणीच्या वेळेस सादर करणे आवश्यक आहे.
 • एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करायचा असल्यास अशा प्रतेक पदाकरीता स्वतंत्र अर्ज करून त्याची स्वतंत्र परीक्षा फी भरणे गरजेचे राहील.
 • अर्जाची फी ऑनलाइन मोड द्वारे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड,इंटरनेट बँकिंग IMPS कॅश कार्डस चा वापर करून फी भरता येईल.
 • अर्जाची फी यशस्वीरित्या भरल्यानंतर एक इ पावती तयार होईल उमेदवारांनी इ पावती आणि माहिती असलेल्या अर्जाची प्रिंटआऊट घ्यावी.
नोकरीचे ठिकाण:
 • महानगर पालिका अंतर्गत भरती साठी नौकरी ठिकाण पुणे आहे.
महत्वाच्या दिनांक:
 • या भरतीचा अर्ज ऑनलाइन सुरू होण्याची तारीख 16 जानेवारी 2024 आहे
 • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 05 फेब्रुवारी 2024 आहे.

रिक्त पदांची संख्या

पदांची संख्यापदाचे नाव
113कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
Pune Mahanagarpalika Vacancy 2024

अर्ज ऑनलाइन याप्रकारे करा

 • पदासाठी अर्ज करताना खालील लिंक चा वापर करू शकता.
 • ऑनलाइन अर्जामद्धे पोस्टसाठी आवश्यक्तेप्रमाणे सर्व आवश्यक माहिती भरा.
 • (नोंद) ऑनलाइन अर्ज करताना चुकीची माहिती भरू नका.
 • खोटी माहिती किंवा बनावट दस्तऐवज चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
 • चालू स्थितीत वापरात असलेला मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी असणे गरजेचे आहे.
 • शैक्षणिक पात्रतेच्या प्रमाणपत्रांच्या स्वसक्षंकीत प्रती स्कॅन करून अपलोड कराव्या.
 • मागास प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज करताना जातीच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत अपलोड करणे.
 • अनुसूचीत जाती/जमाती व्यतिरिक्त मागास प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसल्याचे सन 2023-24 या वर्षाचे नॉन क्रिमीलेअऱ प्रमाणपत्र असावे.
 • अर्ज केल्यानंतर त्याची प्रिंट उमेदवाराने भविष्यातील संदर्भासाठी सांभाळून ठेवावी. तसेच अर्ज करताना दिलेले ईमेल लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
 • अर्जाची देय फी भरल्याशिवाय अर्ज पूर्ण सबमीट होणार नाही योग्य पद्धतीने शुल्क भरल्यानंतर अर्ज पुर्णपणे सबमीट होईल.
 • आवश्यक लागणारी कागदपत्रे सविस्तर दिसत असल्याची काळजी घ्यावी. सुस्पष्ट ते दिसत आहेत हे तपासावे.
 • कुठल्याही प्रकारे इतर प्रवर्गाचा दावा करताना आवश्यक प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
 • कृपया अधिक तपशील माहिती जाणून घेण्यासाठी सोबत दिलेली PDF जाहिरात पहावी.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया

 1. प्रोफाइल निर्मिती/प्रोफाइल अद्ययावत करणे
 2. अर्ज सादरीकरण
 3. शुल्क भरणे

पुणे महानगरपालिका 2024 भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता

लागणारे शिक्षणपदाचे नाव
म्युनिसीपल कॉर्पोरेशन पुणे साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्णवेळ पदवी/पदवीका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.शैक्षणिक पत्रातेची सविस्तर माहिती तुम्ही दिलेल्या जाहिरातीद्वारेही पाहू शकता.कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
Education Qualification For Pune Mahanagarpalika Recruitment 2024
इतर भरती पहा
उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत 1646 पदांची भरतीइथे पहा
दमण आणि दीव अंतर्गत पदविधारक उमेदवारांना संधी 317 पदांची भरतीइथे पहा
इतर नोकरी
पुणे महानगरपालिका भरतीसाठी लागणारी कागदपत्रे
 • आधार कार्ड
 • मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्ण वेळ पदवी/पदविका
 • वैध मोबाइल क्रमांक
 • वैध ई-मेल
 • अनुभव असल्यास प्रमाणपत्र
 • पासपोर्ट आकारातील फोटो
 • उमेदवाराची सही
 • ओळख पुरावा
 • शैक्षणिक निकाल
 • जातीचे प्रमाणपत्र (राखीव प्रवर्गातील उमेदवार असल्यास)
 • कास्ट व्हॅलीडिटी
 • नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र
 • दिव्यांग व्यक्ति असल्यास पुरावा
 • लहान कुटुंब प्रमाणपत्र
 • विवाहित स्त्रियांच्या नावात बदल असल्याचा पुरावा.
 • महाराष्ट्र राज्याचे अधिवास असल्याचे प्रमाणपत्र (डोमसाईल)
 • प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
 • अर्जदारची माहिती बरोबर असल्याचे स्वयघोषणापत्र
 • भूकंपग्रस्त प्रमाणपत्र
 • खेळाडू व अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र

वरील प्रमाणे सर्व कागदपत्रे पुणे महानगरपालिका अंतर्गत भरतीसाठी अर्ज करताना लागेल.

सूचना

सर्व अर्जदारांनी पदाच्या आवश्यक आणि जाहिरातीमद्धे नमूद केलेल्या इतर अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
त्यांच्याकडे किमान आवश्यक पात्रता आहे हे अर्ज करण्यापूर्वि त्यांनी तपासा उमेदवार कोणत्याही पात्रतेच्या अटी पूर्ण करीत नाही असे निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर आढळून आल्यास उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाईल.

निवड पद्धत

 • ऑनलाइन परीक्षा
 • मुलाखत

पुणे महानगरपालिका भरती 2024 वेतन श्रेणी

वेतनपदाचे नाव
पुणे महापालिका भरतीतील पदांचे वेतन दरमहा रु 38,600/- ते रु.1,22,800/- पर्यंत राहील.कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
Pune Mahanagarpalika Recruitment Salary Details

पुणे महानगरपालिका भरती महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईटवेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
सविस्तर जाहिरातजाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
Important Links For Pune Mahangarpalika Bharti 2024

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता,कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्‍या मिळवण्यास मदत करा.सरकारी व खाजगी नोकर्‍यांचे मोफत अपडेट मिळवा.mahasarkarnaukri.com ला भेट द्या.

अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण सूचना

अर्ज मराठी व इंग्रजी भाषेत उपलब्ध करून देण्यात आला असला तरी संगणक प्रक्रियेसाठी अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे.
महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात बदल झाला असल्यास लग्नापूर्वीचे नाव, लग्नानंतरचे नाव त्या संदर्भात आवश्यक कागदपत्रे, विवाह नोंदणी दाखला जमा करणे आवश्यक आहे.

अर्ज करताना जे नाव एसएससी किंवा तत्सम प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणेच अर्जामध्ये भरावेत नाव बदल झाल्यास किंवा प्रमाणपत्रातील नावात कोणत्याही प्रकारचा बदल असल्यास त्यासंबंधी बदला संदर्भातील राजपत्राची प्रत कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करावी, पत्रव्यवहाराकरिता स्वतःचा पत्ता इंग्रजीमध्ये लिहावा, कागदपत्रे तपासणीच्या वेळी अर्जामधील माहिती संदर्भातील कागदपत्रे पुरावे सादर करू न शकल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.

पुणे महानगरपालिका भरती परीक्षेचे प्रवेशपत्र

www.pmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेच्या किमान 7 दिवस आधी उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे उपलब्ध होतील. उमेदवारांनी परीक्षा प्रवेशपत्र त्यांच्या लॉगिन खात्यात लॉगिन करून संकेतस्थळावरून काढून घ्यावे.परीक्षेच्या वेळेस उमेदवारांनी प्रवेशपत्राची प्रिंट आणि ओळखीचा पुरावा छायांकित प्रतिसह सोबत ठेवणे बंधनकारक आहे.

परीक्षा व परीक्षेचे केंद्र

प्रश्न पत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नासाठी 02 गुण असतील.

परीक्षा प्रवेश पत्र मध्ये दिलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीनेच घेतली जाईल परीक्षा केंद्र परीक्षेचे ठिकाण वेळ व दिनांक व सत्र इत्यादी बाबत बदलांची विनंती मान्य केली जाणार नाही महापालिकेस परीक्षा रद्द किंवा नवीन केंद्र समाविष्ट इत्यादी बाबतचे अंतिम अधिकार आहेत महापालिकेस उमेदवाराने मागणी केलेल्या परीक्षा केंद्र अतिरिक्त केंद्र देण्याचा अधिकार असेल तसे दिले जाऊ शकते.

उमेदवारांनी स्वखर्चाने आपल्या जबाबदारीवर परीक्षा केंद्रात उपस्थित राहायचे आहे. या संबंधात कोणत्याही प्रकारच्या हानी किंवा नुकसानीस महापालिका जबाबदार असणार नाही. एखाद्या परीक्षा केंद्रावर पुरेसे उमेदवार ऑनलाईन परीक्षेसाठी उपस्थित न झाल्यास किंवा केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त उमेदवार झाल्यास महापालिकेस उमेदवाराचे केंद्र बदलण्याचा अधिकार असेल.

या भारतीचे पूढील अपडेट व इतर भविष्यातील नोकरीचे अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी महासरकारनोकरी वेबसाइट ला भेट द्या. व महासरकारनोकरी च्या व्हाट्सअँप ग्रुप ला खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करून जॉइन व्हा.

mahasarkar Naukri
तुमच्या मित्रांना पाठवा