महापारेषण अंतर्गत 444 पदांची भरती अर्ज ऑनलाइन | Mahatransco Recruitment 2024 Apply Online

Mahatransco Recruitment 2024 Apply Online

Mahatransco Recruitment 2024 Apply Online : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे यामध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ -2 या पदांची भरती जाहीर केली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना शेवटच्या तारखेपुर्वी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी भरती 2024 जाहिरातीप्रमाणे एकूण 444 पदांची भरती जाहीर झाली आहे. अर्ज सादर करण्याची शेवट तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.


सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

Mahatransco Recruitment 2024 Apply Online

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी भरती अंतर्गत पदांच्या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व रिक्त पदांची नावे इतर आवश्यक तपशीलवार माहिती खाली दिली आहे इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी आपले अर्ज ऑनलाइन करावे.पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार महासरकार नोकरी ला भेट द्या.

पदाचे नाव:
 • वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ-1,तंत्रज्ञ -2
एकूण पदे :
 • 444 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे त्यासाठी, {कृपया दिलेली मूळ जाहिरात वाचावी.}
अर्ज पद्धत:
 • अर्ज ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाइट वर करायचा आहे. खालील लिंक द्वारे थेट अर्ज करता येईल.
अर्ज फी:
 • सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना – रु.600/- अर्ज फी भरावी लागेल.
 • मागासवर्गीय प्रवर्ग व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक उमेदवारांना रु.300/- फी भरावे लागेल.
महत्वाच्या दिनांक:
 • 31 जानेवारी 2024 या तारखेपासून अर्ज ऑनलाइन सुरू.
 • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.
 • ऑनलाइन परीक्षेची अंदाजित तारीख फेब्रुवारी / मार्च 2024
नोकरी ठिकाण :
 • महाराष्ट्र

महापारेषण भरती 2024 रिक्त पदांची संख्या

रिक्त पदांची संख्यापदांचे नाव
98 पदेवरिष्ठ तंत्रज्ञ
137 पदेतंत्रज्ञ-1
209 पदेतंत्रज्ञ -2

महापारेषण भरती 2024 शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ तंत्रज्ञ,तंत्रज्ञ-1,तंत्रज्ञ -2 या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणेशिकाऊ उमेदवारी कायदा 1969 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT अंतर्गत प्रदान केलेले वीजतंत्री किंवा तारतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक उमेदवार किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विस्तारी किंवा तारतंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण झाल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT नवी दिल्ली द्वारे प्रदान केलेली वीजतंत्री/तारतंत्री या व्यवसायाचे राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र धारक उमेदवार

महापारेषण भरती 2024 वेतनश्रेणी

 • वरिष्ठ तंत्रज्ञ या पदासाठी वेतन रु. 30810-1060-36110-1160-47710-1265-88190
 • तंत्रज्ञ 1 पदासाठी रु.29935-955-34710-1060-45310-1160-82430
 • तंत्रज्ञ 2 पदाचे वेतन रु. 29035-710-32585-955-42135-1060-72875

महापारेषण भरती 2024 साठी ऑनलाइन अर्ज असा करा

कंपनीने ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिलेल्या लिंक द्वारे भरलेलेच अर्ज स्वीकारले व विचारात घेतले जाणार असून पोस्टाने

किंवा इतर कोणत्याही मार्गाने सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.

पात्र उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी

जाहिरातीत नमूद केलेली शैक्षणिक अर्हता वय व इतर बाबी तसेच अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत नमूद केल्याप्रमाणे सदर पदासाठी पात्र आहोत का याची खात्री करावी.

अर्जाची नोंदणी

नोंदणी करण्यासाठी उमेदवारांनी Click Here For New Registration वर क्लिक करून नोंदणी करावी नोंदणीसाठी उमेदवाराने

स्वतःचे नाव पत्ता ई-मेल व मोबाईल क्रमांक काळजीपूर्वक भरावा नोंदणी पूर्ण झाल्यावर उमेदवाराने नमूद केलेल्या मोबाईल

क्रमांक व ईमेल वर पुढील प्रक्रिया करण्यासाठी नोंदणी क्रमांक व पासवर्ड देण्यात येईल.

नोंदणी पूर्ण करण्याआधी अर्जातील संपूर्ण माहिती पूर्ण वाचून भरलेली माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यावर I Agree वर

क्लिक करावे त्यानंतर Complete Registration वर क्लिक करावे.

सदर नोंदणी क्रमांक व पासवर्ड याची नोंद उमेदवाराने आपल्याकडे काळजीपूर्वक करून ठेवावी.भरती प्रक्रियेच्या पुढील सूचना

ईमेल व मोबाईल क्रमांकावर देण्यात येतील त्यामुळे, उमेदवाराने आपला मोबाईल क्रमांक व ई-मेल ही भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत

वापरात ठेवावी व उमेदवाराने सुरू असलेला मोबाईल क्रमांक आणि ईमेल नमूद करावा.

कागदपत्रे अपलोड

उमेदवाराचे पासपोर्ट आकारातील फोटो व सही स्कॅन करून दिसतील असे स्पष्ट अर्जामध्ये नमूद केलेल्या ठिकाणी अपलोड करणे

बंधनकारक आहे त्यासाठी उमेदवाराने दिलेल्या विहित नमुण्या प्रमाणे आपले कागदपत्रे JPG व JPEG फॉर्मेट मध्ये 4*5 cm X3.5

cm मध्ये 20 ते 30 kb आकारात अपलोड करावे.

अर्जात माहिती भरणे

उमेदवार एकाच वेळी पूर्ण माहिती भरू शकत नसल्यास ते ऑनलाईन अर्ज भरलेली माहिती Save And Next या बटनावर क्लिक

करून ती माहिती सेव करता येईल Save And Next या बटनाचा वापर उमेदवार भरलेली माहिती बरोबर असल्याचे खात्री करण्यासाठी करू शकतात.

अर्जामध्ये भरलेली माहिती उमेदवारांना इंग्रजी भाषेतून भरावी लागेल पूर्ण माहिती भरल्यानंतर माहिती बरोबर आहे याची खात्री

करावी कारण Complete Registration वर क्लिक केल्यानंतर अर्जामध्ये कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.

नोंदणी पूर्ण

अर्जामध्ये भरलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करून झाल्यावर Complete Registration वर क्लिक केल्यानंतर अर्जात

कोणताही बदल करता येणार नाही त्यानंतर संगणकावरील Complete Registration वर क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज स्वीकारला जाईल.

अर्जाचे शुल्क भरा

Payment वर क्लिक करून परीक्षा शुल्क भरावे परीक्षा शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन अर्ज हा पेमेंट गेटवे

सोबत एकीकृत असल्यामुळे तुम्ही परीक्षा शुल्क भरले नाही तोपर्यंत अर्ज स्वीकारला जाणार नाही.

शुल्क हे डेबिट कार्ड रुपये विजा किंवा मास्टर कार्ड क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग आय एम पी एस कार्ड मोबाईल वॉलेट वापरून केले जाऊ शकते.

परीक्षा शुल्क भरल्यानंतर please wait for the intimation from the server do not press back or refresh button in order to avoid double charge असा संदेश येईल.

व्यवहार पूर्ण होण्यापर्यंत कोणतेही बटन क्लिक करू नये व्यवहार पूर्ण झाल्यावर इ- पावती प्राप्त होईल.इ – प्राप्त न झाल्यास ऑनलाईन व्यवहार प्रक्रिया पूर्ण झालेली नाही असे समजावे.

उमेदवारांनी पुन्हा खाते लॉगिन करून त्यांचा रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड वापरून पेमेंट प्रक्रिया पूर्ण करावी उमेदवाराने ही

पावती व परीक्षा शुल्क भरण्याची माहिती असलेल्या ऑनलाईन अर्जाची एक प्रत काढून त्यांच्याकडे सांभाळून ठेवावी.

महापारेषण भरतीसाठी अर्ज व जाहिरात

अधिकृत संकेतस्थळइथे पहा
सविस्तर माहिती पहाइथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज इथे करा
एकापेक्षा जास्त वेळेस अर्ज भरल्यास?

एका पेक्षा जास्त वेळेस अर्ज केला असल्यास अशा उमेदवारांच्या बाबतीत त्यांचा शेवटचा अर्जावर त्यामधील माहिती ग्राह्य धरण्यात येऊन अगोदरचा अर्ज व माहिती रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

भरती प्रक्रियेची संबंधित माहिती वेळोवेळी कंपनीच्या www.mahatransco.in या संकेतस्थळावरील career या ठिकाणी प्रसिद्ध होईल भरती अपडेट वेळेवर पाहण्यासाठी कंपनीच्या संकेतस्थळावर भेट द्यावी.

महापारेषण निवड प्रक्रिया :

अर्ज ऑनलाईन यशस्वीरित्या सादर केलेल्या सर्व उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची Objective Type ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल सदर परीक्षा ही पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता व सामान्य अभियोग्यता चाचणी यावर आधारित राहील.

उमेदवाराची अंतिम निवड ही त्याच्या पात्रते संबंधीच्या कागदपत्रांची पडताळणी करूनच केली जाईल.
ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे राहील.

भरतीविषयी विविध जाहिराती जाणून घेण्यासाठी महासरकारनोकरी ला भेट द्यावी व खालील लोगोवर क्लिक करून ग्रुपमध्ये सामील व्हा व नोकरीच्या संदर्भातील माहिती इतरांना नक्की शेअर करा.