राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली, येथे 90 जागांची भरती सुरू | NHM Sangli Bharti 2024

NHM Sangli Bharti 2024

NHM Sangli Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली येथे आरोग्य सेवक पुरुष, वैद्यकीय अधिकारी,स्टाफ नर्स पदाकरिता भरती निघाली आहे. एकूण 90 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल.इच्छुक व पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखे आधी अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे.

NHM Sangli Bharti 2024

NHM Sangli Bharti 2024 विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे, यामध्ये एकूण रिक्त जागा,लागणारी शैक्षणिक पात्रता,वेतन या संदर्भातील माहिती आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.

Details Of NHM Satara Bharti 2024

एकूण रिक्त पदे 90
पदाचे नावआरोग्य सेवक (पुरुष), वैद्यकीय अधिकारी,स्टाफ नर्स.
वय मर्यादा38 वर्ष
अर्जाची फीनाही
शेवट तारीख09 फेब्रुवारी 2024
नोकरीचे स्थानसांगली
अर्ज करण्याची पद्धतऑफलाइन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.zpsangli.com

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2024 शैक्षणिक पात्रता

आरोग्य सेवक (पुरुष)विज्ञान शाखेतील 12 वी पास + पॅरामेडीकल बेसिक प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा सॅंनिटरी इन्स्पेक्टर अभ्यासक्रम असलेला उमेदवार.
वैद्यकीय अधिकारीएम.बी.बी.एस./बीएएमएस
स्टाफ नर्सजीएनएम/बीएससी नर्सिंग

आवश्यक पात्रता असणारे उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी नोकरीकरिता अर्ज करू शकतात.

NHM Sangli Pay Scale (वेतन)

NHM Sangli Bharti 2024 च्या पदासाठी पदानुसार वेतन खालीलप्रमाणे आहे.

आरोग्य सेवक (पुरुष)रुपये. १८०००/-
वैद्यकीय अधिकारीरुपये. ६००००/-
स्टाफ नर्सरूपये. २००००/-
Required Documents For NHM Sangli Recruitment (आवश्यक कागदपत्रे)

ईमेल पत्ता व मोबाइल क्रमांक संपूर्ण भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चालू स्थितीत असणे गरजेचे आहे.
प्रथम विहित नमुन्यामद्धे अर्ज
जन्म तारखेच्या पुराव्यासाठी १० वी गुणपत्रक आणि सनद
१२ वी गुणपत्रक व सनद
पदवीचे गुणपत्रक १ ले ते अंतिम वर्ष सर्व प्रयत्न जेणेकरून एकत्रित सर्व गुण काढणे शक्य होईल.
पदवी प्रमाणपत्र
ज्या त्या शैक्षणिक पात्रतेसह तांत्रिक पदासाठी संबंधित परिषदेकडील नोंदणी लागू आहे त्या शैक्षणिक पात्रतेची वैध असलेली परेशदेची तत्सम कौन्सिल चे नोंदणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे.
पासपोर्ट आकारातील उमेदवारचे दोन फोटो.
लहान कुटुंब प्रमाणपत्र
राखीव संवर्गातील उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
शासकीय अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र
वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला,जन्माचा दाखला
वय,राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र.
नावामद्धे बादल असल्यास राजपत्र,विवाह नोंदणी आणि नोटराईज्ज अँफिडेव्हिट जोडणे आवश्यक राहील.

NHM Sangli Recruitment Application | अर्ज प्रक्रिया

 • उपरोक्त पदांसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीनेच करावा लागणार आहे.
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी प्रति नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • ईमेल द्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही
 • दिलेल्या कालावधीमध्ये कार्यालयीन दिवशी दिलेल्या वेळेत उपस्थित राहून अर्ज सादर करण्यात यावेत.
 • नमूद मुदती अगोदर किंवा मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही.
 • अर्ज करण्यासाठी शेवट दिनांक 09 फेब्रुवारी 2024 आहे.
 • आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अर्ज सोबत झेरॉक्स प्रतीत साक्षांकित स्व साक्षांकित करून जोडावी अर्ज सादर केल्याची पोहोच घेण्याकरिता अर्जाची वरील पृष्ठभागाची झेरॉक्स घेऊन येणे.
 • अर्ज करत असलेल्या पदाचे नाव व सामाजिक आरक्षणानुसार सदर पदासाठी नमूद (जातीचा प्रवर्ग) इतर आवश्यक असलेली सर्व माहिती अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करावी.
 • अर्ज सादर केलेल्या व मुलाखतीसाठी उपस्थित असणाऱ्या उमेदवारांना प्रवास भत्ता किंवा इतर कुठलाही भत्ता देय राहणार नाही.
 • भरती प्रक्रियेच्या दरम्यान ज्या-ज्या वेळी उमेदवारांना बोलावले जाईल त्या-त्या वेळी त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल तसेच उपस्थित राहण्यासाठी कोणतेही मानधन किंवा प्रवास खर्च दिला जाणार नाही.
 • मागासवर्गीय उमेदवारांनी अर्ज आरक्षणामधून सादर करण्यासाठी अर्जासोबत जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे अन्यथा अर्ज पात्र ठरविण्यात येईल, कंत्राटी स्वरूपाचे पदे असल्याने जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
 • अर्धवट अपूर्ण वाचण्यायोग्य नसलेला अर्ज सादर केला असल्यास असा अर्ज नाकारला गेल्यास किंवा अपात्र ठरला गेल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील त्यामुळे अर्ज करताना कुठल्याही चुका करू नये.
 • अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया दिलेली सोबतची जाहिरात लिंकवरून पहा.

पदांची निवड प्रकिया

पदांसाठी निवड प्रक्रिया ही प्राप्त अर्जाच्या संख्येनुसार छाननी करून गुणक्रमी यादी तयार करण्यात येऊन गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल निवड समितीचा निर्णय अंतिम राहील.

गुणांकन यादी तयार केल्यानंतर दोन किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवारांना समान गुण असल्यास ज्या उमेदवाराचे वय जास्त आहे अशा उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

तसेच उमेदवारांचे गुणाकर व वैद्यकीय समान असले तर अशावेळी उमेदवाराचा संबंधित पदाची निगडित अनुभव जास्त असेल अशा उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.

निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर सात दिवसांमध्ये नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणे बंधनकारक राहील अन्यथा त्यांची नियुक्ती आदेश आपोआप संपुष्ट जाणून प्रतीक्षाधीन यादीतील पुढील उमेदवारास नियुक्त करण्यात येईल.

Important Links For National Health Mission Sangli Jobs 2024

अधिकृत संकेतस्थळhttps://www.zpsangli.com
संपूर्ण जाहिरातइथे पहा
अर्ज पाठवण्याचा पत्ताराष्ट्रीय आरोग्य अभियान नवीन प्रशासकीय इमारत ३ रा मजला, जिल्हा परिषद सांगली – ४१६४१६

राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली भरती अटी व शर्ती

वरील सर्व पदे ११ महिने 29 दिवस या कालावधीसाठी कंत्राटी तत्त्वावर कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत.
अर्जदार संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच त्यांच्या विरोधात कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.

जाहिरातीमधील रिक्त पदांच्या संख्येचे शैक्षणिक पात्रता मानधन वयोमर्यादा सामाजिक आरक्षण नियुक्ती ठिकाणांमध्ये बदल व नमूद केलेल्या अटी शर्तीमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार या कार्यालयाचे असून निवड प्रक्रियेत कोणत्याही क्षणी बदल करण्याचा अधिकार मा. कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्याकडे आहे.

रिक्त पदांच्या संख्येमध्ये बदल झाल्यास त्याबाबत उमेदवारांना आक्षेप घेता येणार नाही.

जर उमेदवारांना एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज सादर करायचा असेल प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज परंतु वेळप्रसंगी एकाच वेळी मुलाखत परीक्षा मुलाखत घेतली गेल्यास कोणत्यातरी एका पदासाठी उपस्थित राहावे लागेल.

या पदासाठी उपस्थित असेल त्या पदाकरिता संबंधित उमेदवार ग्राह्य धरून दुसऱ्या पदासाठी गैरहजर ग्राह्य धरण्यात येईल.

निवड प्रक्रियेतील पात्र अपात्र उमेदवारांची यादी भरती प्रक्रियेची माहिती www.zpsangli.com या वेबसाईटवर प्रसिद्ध होईल. याबाबत कुठलाही स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही.

वर्ष 60 पेक्षा अधिक वयाच्या उमेदवारांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून शारीरिक दृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र अर्ज सोबत जोडणे बंधनकारक राहील.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम केलेल्या अथवा करत असलेल्या उमेदवारांना पाच वर्षे वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे.

भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भविष्यात एखादा ठिकाणी कर्मचारी यांना राजीनामा दिल्यामुळे जागा रिक्त झाल्यास प्रतीक्षा यादीतील मेरिट मधून पुढील उमेदवारास नवीन भरती प्रक्रिया न करता नियुक्त करण्याचे आदेश दिले जातील.

सदर प्रतीक्षा यादी ही वेबसाईटवर प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील एक वर्षापर्यंत वैध राहील उमेदवारांनी अर्ज सादर केलेल्या पदांच्या निगडित संबंधित उमेदवारास अनुभव असल्यास अनुभव ग्राह्य धरण्यात येईल, त्याबाबतचे नियमावलीनुसार गुण देण्यात येतील इतर क्षेत्रातील सदर पदाची निगडित नसलेला अनुभवा असल्यास तो अनुभव ग्राह्य धरल्या जाणार नाही.

मुलाखती नंतर निवड झालेल्या उमेदवारांना पदावर रोज होण्यासाठी करारपत्रातील अटी मान्य करून तसा करारनामा रुपये 100/- च्या मुद्रांकावर द्यावा लागेल.

कंत्राटी आरोग्य सेवक या पदासाठी फक्त पुरुष उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार आहे.

FAQ

NHM सांगली भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख

उत्तर : NHM भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.

सदरील पदे कायमसाठी सेवेत रुजू होण्यासाठी आहेत का?

उत्तर : NHM सांगली भरतीची पदे ही केवळ कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहे.

नोकरीची माहिती इतरांना नक्की शेअर करा व पुढील विविध भरतीसाठी https://mahasarkarnaukri.com ला भेट द्या.

वरील लोगोवर क्लिक करून ग्रुपमध्ये सामील व्हा व अपडेटस मिळवा.

तुमच्या मित्रांना पाठवा