Indian Coast Guard Bharti 2024 Apply Online
Indian Coast Guard Bharti 2024 Apply Online : भारतीय तटरक्षक दलात भरती होण्याची चांगली संधी आहे एकूण 260 पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून (नाविक जनरल ड्यूटी) पदासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी भारतीय तटरक्षक दल भरतीचा अर्ज करताना लागणारी कागदपत्रे पदांचे तपशील त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी,इत्यादी माहिती आपण खालील लेखात जाणून घेणार आहोत.
Indian Coast Guard Bharti 2024 Apply Online
भारतीय तटरक्षक दल भरतीचे ऑनलाइन अर्ज 13 फेब्रुवारी 2024 या तारखेपासून सुरू होतील.उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर आपले अर्ज ऑनलाइन करावे ऑनलाइन अर्जाची शेवट तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.
Indian Coast Guard Vacancy 2024 Details
तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असताना चांगली संधी आहे तुमच्यासाठी तटरक्षक दल अंतर्गत होणार्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. उपलब्ध जागा व इतर तपशील खालील प्रमाणे आहे.
नाविक जनरल ड्यूटी | 260 पदे |
वयमर्यादा | 18 ते 22 वर्ष |
अर्जाची फी | रु. 300/- |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 13 फेब्रुवारी 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 27 फेब्रुवारी 2024 |
अधिकृत वेबसाइट | इथे पहा |
Education Qualification Details Bharti 2024
पदासाठी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
नाविक जनरल ड्यूटी | शालेय शिक्षण मंडळ परिषद (COBSE) द्वारे मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून गणित आणि भौतिकशास्त्रासह 10+2 उत्तीर्ण उमेदवार. |
Indian Coast Guard Bharti Age Limit
प्रवर्गानुसार वय मर्यादेत दिलेली सूट खालील प्रमाणे आहे.
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता 22 वर्षे वयोमार्यादा असणार आहे.
ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षांची सूट असणार आहे.
एस्सी/एसटी/ प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे वयोमार्यादेत सूट आहे.
Indian Coast Guard Bharti 2024 Navik Required Documents
भारतीय तटरक्षक दल भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- उमेदवार आरक्षण प्रवर्गातून अर्ज करत असताना त्यांच्याकडे श्रेणी प्रमाणपत्र असले पाहिजे. (एससी/ ओबीसी/ नॉन- क्रिमिलेयर ईडब्ल्यूएस
- इयत्ता १० वी ची मार्कमेमो
- १० वीचे प्रमाणपत्र
- इ. १० वी करिता अतिरिक्त गुणपत्रिका लागू असल्यास
- सीजीपीए/ग्रेड १० वी चे टक्केवारीत रूपांतर करण्याचे सूत्र (लागू असल्यास)
- इयत्ता १२ वी वर्गातील मार्कशीट
- इयत्ता बारावीतील प्रमाणपत्र
- सीजीपीए/ग्रेड १२ वी चे टक्केवारीत रूपांतर करण्याचे सूत्र (लागू असल्यास)
- १२ वी चे अतिरिक्त मार्कशीट (लागू) असल्यास.
- सरकारी किंवा खाजगी सेवेत नोकरी करणारे उमेदवार असेल तर, त्यांना एनओसी. असावी अर्ज भरण्याच्या तारखेला किंवा नंतर.
- ओळख पुराव्यासाठी आधार कार्ड
- ईमेल पत्ता
- मोबाइल क्रमांक
Indian Coast Guard Selection Process
निवड प्रक्रिया :
लेखी परीक्षा
मैदानी परीक्षा
शारीरिक चाचणी
कागदपत्रे पडताळणी
लेखी परीक्षा
लेखी परीक्षेमद्धे 2 विभागातील परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.
विभाग 1 मध्ये 45 मिनिटांची परीक्षा घेतली जाईल एकूण 60 गुणांची
त्यामध्ये गणित 20 गुण विज्ञान 10 गुण इंग्रजी 15 गुण तर्क 10 गुण सामान्य ज्ञान 05 गुण.
पहिल्या विभागातील पेपर हा इयत्ता 10 वी अभ्यासक्रमावर आधारित असतो.
या परीक्षेत सर्वसाधारण उमेदवारांना पास होण्यासाठी सर्वसाधारण उमेदवारांना किमान 50 गुण मिळवणे आवश्यक आहे.
व एस्सी/एसटी प्रवर्गातील उमेवारांना किमान 44 गुण प्राप्त करावे लागतील.
दुसर्या विभागातील एकूण 50 गुणांची परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.
यामध्ये पेपर हा इयत्ता 12 वी च्या गणित आणि भौतिकशास्त्र अभ्यासक्रमावर आधारित असेल या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसते.
गणित विषयातील 25 गुण व भौतिकशास्त्र 25 गुणांची परीक्षा घेतली जाईल. परीक्षेचा कालावधी 30 मिनिटे राहील.
विभाग 2 परीक्षेत उत्तीर्ण ठरण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना किमान 20 गुण मिळणे आवश्यक आहे.
एस्सी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी 17 गुण मिळवणे आवश्यक आहे.
मैदानी परीक्षा (PFT)
संगणक आधारित लेखी परीक्षेतील कामगिरीच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार केली जाईल गुणवत्ता यादीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मैदानी परीक्षेसाठी प्रवेशपत्र लागू केले जाईल.
मैदानी परीक्षेमद्धे पात्र किंवा अपात्र ठरविले जाते गुण दिले जात नाही.
यामध्ये उमेदवारांना 7 मिनिटांच्या आत 1600 मीटर धावावे लागेल. धाव पूर्ण करताच लगेच न थांबता 20 उठाबशा व 20 जोर काढावे लागणार न थांबता.
शारीरिक चाचणी
सुरूवातीची वैद्यकीय परीक्षा घेतली जाईल यामध्ये फक्त उमेदवारांची उंची व वजन मोजले जाईल.
कागदपत्रे पडताळणी
वरील शारीरिक चाचणीत पात्र उमेदवारांना इ अॅडमिट कार्ड जारी केली जाईल ज्यामधे 2 दिवसांच्या चाचणीसाठी बोलावले जाईल ही प्रक्रिया आयएनएस चिल्का येथे होईल.
ज्यामधे कागदपत्रे पडताळणी, शेवटची वैद्यकीय चाचणी बारकाईने होईल.कागदपत्रे तपासणी मध्ये सर्व मूळ कागदपत्रे तापसली जाते व पोलिस पडताळणी व इतर मूळ प्रमाणपत्रांची तपासणी केली जाते.
ऑनलाइन अर्जात दिलेली सर्व माहिती जुळली पाहिजे उमेदवारांनी तयार केलेल्या सर्व मूळ कागदपत्रांसह जसे की इयत्ता 10 वी /12 वी, डिप्लोमा मार्कशीट, ओळख पुरावा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट, श्रेणी प्रमाणपत्र, वैयक्तिक विषय आणि एकूण गुण CGPA लागू असल्यास.
पडताळणीसाठी अर्ज फॉर्म अपलोड केलेले आणि मूळ कागदपत्रे यामधील नाव जन्मतारीख पालकांचे नाव विषयानुसार कागदपत्रांसह कागदपत्रांची वैधता श्रेणी प्रमाणपत्र तपशील अयशस्वी झाल्यास उमेदवारी रद्द केली जाईल.
कागदपत्रे अर्जाच्या अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वीची असणे आवश्यक आहे अपलोड केलेल्या सर्वांची वैधता कागदपत्रे किमान 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत असणे आवश्यक आहे ऑनलाइन अर्जातील कोणतीही खोटी माहिती आढळल्यास उमेदवारी अर्ज केली जाईल. उमेदवारी नाकरण्याची कोणकोणती कारणे असू शकतात इथे पहा
Indian Coast Guard Recruitment 2024 Important Links
भारतीय तटरक्षक दल भरती महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ | https://www.indiancoastguard.gov.in/ |
सविस्तर माहिती | इथे पहा |
ऑनलाइन अर्ज | इथे अर्ज करा (13 फेब्रुवारी 2024 रोजी अर्ज सुरू होईल) |
इतर भरती पहा
पोलीस प्रशिक्षण महाराष्ट्र यांच्या अंतर्गत भरती सुरू
How To Apply Indian Coast Guard Navik General Duty Application
13 फेब्रुवारी 2024 ते 27 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
उमेदवारांनी https://joinindiancoastguard.cdac.in/cgept/ वर लॉगिन करावे ई-मेल आयडी मोबाईल क्रमांक स्वतःची नोंदणी करावी.
उमेदवारांनी ईमेल आयडी 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत वैध राहील याची काळजी घ्या नोंदणीकृत ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक लक्षात ठेवा कारण तेच अर्जामध्ये एन्क्रिप्ट केले जातील.
जर उमेदवार जायचे मोबाईल क्रमांक विसरला नसेल तरच उमेदवारांच्या लॉगिन डॅशबोर्ड मध्ये लॉगिन करणे शक्य होईल आणण्याचा तो ही प्रवेश पत्र डाउनलोड करू शकणार नाही किंवा पाहू शकणार नाही त्यांचा निकाल आणि ICG यासाठी जबाबदार असणार नाही.
ऑनलाइन अर्जबाबतीत प्रश्न असल्यास उमेदवार icgcell@cdac.in वर ईमेल द्वारे किंवा दूरध्वनी क्रमांक * 020-25503108/020-020-25503109 वर संपर्क साधू शकतात.
भरती प्रक्रियेसाठी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे त्याकरिता पासपोर्ट आकारातील अलीकडील काळातील रंगीत छायाचित्र, स्कॅन केलेली स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा.
इयत्ता 10 वी मार्कशीट किंवा जन्म प्रमाणपत्र जन्मतारखेचा पुरावा म्हणून ओळखीच्या पुराव्या साठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र वाहन चालक परवाना इत्यादी व शैक्षणिक कागदपत्रे आवश्यक राहील.
कागदपत्रे दिसतील अशी स्पष्ट स्कॅन करून अपलोड करावी जर स्पष्ट नसतील तर अर्ज रद्द होऊ शकतो, अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी उमेदवारांनी त्यांची माहिती चुकीची किंवा खोटी नमूद करू नये.
अर्ज करण्या आधी उमेदवारांनी सविस्तर माहिती पहावी शैक्षणिक व इतर आवश्यक माहिती पाहून मगच भरतीसाठी आपला अर्ज करायचा आहे.
नोकरीविषयक माहिती इतरांना शेअर करा व नवनवीन भरतीविषयी जाणून घेण्यासाठी mahasarkarnaukri.com वेबसाइट ला भेट द्या.महासरकार नोकरी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी दिलेल्या लोगोवर क्लिक करून सामील व्हा.