शासन मुद्रण,लेखनसामग्री व प्रकाशन संचालानलय,मुंबई येथे रिक्त पदांची भरती सुरू | DGPS Maharashtra Bharti 2024

DGPS Bharti 2024 Apply Online

DGPS Bharti 2024 Apply Online : DGPS Bharti 2024 Apply Online : शासन मुद्रण लेखन सामग्री व प्रकाशन संचालनालय मुंबई अंतर्गत पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज 09 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झाले आहेत व अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत ही 29 फेब्रुवारी 2024 आहे.


सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

DGPS Bharti 2024 Apply Online

DGPS Bharti 2024 – या भरतीमध्ये वरिष्ठ मुद्रितशोधक,सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी), मुद्रितशोधक, मूळप्रतवाचक, दूरध्वनीचालक, बांधणीसहाय्यकारी या पदांच्या एकूण 54 रिक्त जागा भरल्या जाणार असून पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.

उमेदवारांना लागणारी भरतीची माहिती जसे की, शैक्षणिक पात्रता, एकूण रिक्त पदे, वयोमार्यादा,वेतनश्रेणी,भरतीची निवड पद्धत,नोकरी ठिकाण,व अर्ज करण्याची प्रक्रिया याबाबत संपूर्ण माहिती खालील लेखामद्धे काळजीपूर्वक वाचावी व आपला अर्ज सादर करावा.

शासन मुद्रण लेखन व प्रकाशन संचालांनालय मुंबई भरती साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे व इतर आवश्यक निर्देश खालील लेखामध्ये वाचा.भरतीची माहिती व अपडेट मिळवण्यासाठी mahasarkarnaukri.com ला फॉलो करा.

DGPS Maharashtra Vacancy 2024

रिक्त पदांच्या भरतीचा आढावा

पदांचे नाववरिष्ठ मुद्रितशोधक,सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी), मुद्रितशोधक, मूळप्रतवाचक, दूरध्वनीचालक, बांधणी सहाय्यकारी
एकूण पदांची संख्या 45 पदे
नोकरी ठिकाणमुंबई
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख 09 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत 29 फेब्रुवारी 2024 अर्ज करण्याची शेवट तारीख आहे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांनुसार आहे त्यासाठी मूळ जाहिरात पहावी.
वयोमार्यादा18 ते 45 वर्ष
अर्जाचे शुल्कअराखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क रु. 1000/- इतके राहील.
मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क रु. 900/- इतके राहील
अधिकृत संकेतस्थळइथे पहा

NO OF Post DGPS Vacancy 2024

रिक्त पदांची संख्या

वरिष्ठ मुद्रितशोधक03 जागा
दूरध्वनीचालक01
मुद्रितशोधक10
सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी)05
मूळप्रतवाचक02
बांधणी सहाय्यकारी33

Salary Details For DGPS Maharashtra Recruitment 2024

पदांनुसार वेतन खालीलप्रमाणे

वरिष्ठ मुद्रितशोधक पदासाठी एस- १०. रु २९२०० – ९२३०० वेतन दिले जाईल.

दूरध्वनीचालक पदासाठी एस – एस – ७ रु. २१७०० – ६९१००

मुद्रितशोधक पदाचे वेतन एस – एस ८ रु २५५०० – ८११००

सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी) – पदासाठी एस एस – १० रु. २९२०० -९२३००

मूळप्रतवाचक पदाकरीता एस – ६ रु. १९९०० – ६३२००. एवढे वेतन दिले जाईल.

बांधणी सहाय्यकारी पदाचे वेतन एस एस – ५ रु. १८००० – ५६९००

Education Qualification For DGPS Maharashtra Bharti 2024

पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव

वरिष्ठ मुद्रितशोधक⚫ माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
मराठी इंग्रजी आणि हिंदी भाषांचे उत्तम ज्ञान.
05 वर्षापेक्षा कमी नाही व वर नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर मोठ्या मुद्रणालायातील मुद्रित शोधनाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र.
⚫ मुद्राक्षरे,मजकुरासाठी मापे, प्रश्नांची मांडणी व फॉर्म ची रचना याचे हवे असलेले ज्ञान.
⚫ पुस्तकांच्या भागांची मांडणी करणे, मुद्रण प्रत संपादित करणे, मुख्यपृष्ठ पुस्तकातील मजकूर व अनुक्रमणिका इत्यादीचे ज्ञान.
⚫जलद वेगाने कामाचा निपटारा व मुद्रित शोधक व जुळणारी कामगारांना हाऊस स्टाईल व लेआउट इत्यादी तांत्रिक मार्गदर्शन करण्याची क्षमता.
दूरध्वनीचालक⚫ माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
⚫ मराठी इंग्रजी व हिंदी या भाषांचे उत्तम संभाषण करण्याची क्षमता.
⚫ दूरध्वनी चालकाचे प्रशिक्षण घेतलेल्या व अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
मुद्रितशोधक⚫ माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
⚫ मराठी इंग्रजी व हिंदी या भाषांचे उत्तम ज्ञान.
⚫ मुद्राक्षे, मजकुरासाठी मापे, पृष्ठांची मांडणी आणि फॉर्मची रचना आणि कागदाचे निरनिराळे आकार व दर्जा यासंबंधी ज्ञान असावे.
⚫ श्रुतलेखन आणि भाषांचे ज्ञान.
सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी)⚫ माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा पास.
मुद्रण तंत्रज्ञान पदविका किंवा अक्षर मुद्रण प्रमाणपत्र यातील कोणत्याही शासन मान्यता संस्थेने जारी केलेले प्रमाणपत्र किंवा संचालनालय यातील 4 वर्षाची शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र किंवा शासनाने मान्य केलेली समकक्ष पात्रता.
⚫ बांधणीच्या विविध प्रकारचा म्हणजेच बांधणीची कामे केसिंग इन, केस मेकिंग, होलोबॅक, लेझर बांधणी, लायब्ररी बांधणी, अर्धा आणि क्वार्टर बांधणी, व दुरुस्ती कामे इत्यादी कामांचा प्रात्यक्षिक अनुभव.
⚫ स्टॉप आणि थ्रू रोलिंग ऑपरेशन्स ऑफ कटिंग, फोल्डिंग, वायर स्टिचिंग, सुईंग मशिन, आयलेंटिंग पंचिंग बनविणे हँड नंबरिंग,दाय स्टॅम्पिंग व लिफाफे बनविणे यातील अनुभव.
⚫ बांधणी विभागमधील सर्व यंत्रे चालवण्याचा अनुभव.
⚫ नामांकित मुद्रलणालयातील कामाचा 3 वर्षापेक्षा कमी नसलेल्या अनुभवाचे प्रमाणपत्र.
मूळप्रतवाचक⚫ माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
⚫ मराठी हिंदी इंग्रजी या प्रादेशिक भाषेतील हस्तलिखित वाचण्याची क्षमता.
⚫ श्रुतलेखन, विरामचिन्हे, वर्ण लेखन आणि निबंध लेखन, यामध्ये अचूकता.
बांधणी सहाय्यकारी⚫ कोणत्याही शासनमान्य शाळेतून इयत्ता 9 वी पास.
⚫ अवजड कामे करण्यासाठी मजबूत शरीरयष्टी.
⚫ बांधणी प्रक्रियेतील फोल्डिंग गॅदरिंग काउंटिंग रॅपिंग आणि लिफाफे तयार करणे या कामाचा अनुभव.
माननीय दिमातील तीन वर्ष शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य.

DGPS Recruitment Age Limit

प्रवर्गानुसार वयोमार्यादा खालीलप्रमाणे

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38 वर्ष वयोमार्यादा.

मागास प्रवर्गातील उमेदवारांना 18 ते 43 वर्ष वयमर्यादा

खेळाडू/अनाथ/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक उमेदवार 18 ते 45 वर्ष

शासकीय कर्मचार्‍यांना वयोमार्यादा नाही.

पदवीधर/पदविका अंशकालीन उमेदवारांना 55 वर्ष

माजी सैनिक व दिव्यांग खुला प्रवर्ग 45 वर्ष.

Important Links For DGPS Maharashtra Recruitment 2024

ऑनलाइन अर्ज व इतर महत्वाच्या लिंक.

सविस्तर जाहिरातइथे पहा
अधिकृत संकेतस्थळइथे पहा
ऑनलाइन अर्ज इथे करा

इतर महत्वाच्या भरती पहा

IDBI बँकेत पदांची मोठी भरती सुरू

DGPS Maharashtra Bharti 2024 Online Application

ऑनलाइन अर्ज असा करा

अर्ज ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या संकेतस्थळावर करावा लागेल इतर कोणतेही अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

application link वर क्लिक करून उमेदवारास त्यांचे नाव,जन्मतारीख,मोबाइल क्रमांक व ईमेल आयडी भरायचा आहे.

नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मिळालेल्या यूजर आयडी व पासवर्ड द्वारे लॉगिन करा व वयक्तिक माहिती भरा.
अतिरिक्त लागणारी माहिती तसेच शैक्षणिक अर्हता व अनुभव यांचा तपशील भरा.

मिळालेला युजर आयडी व पासवर्ड सांभाळून ठेवा भरतीप्रक्रिया पूर्ण होण्यापर्यंत त्याची आवश्यकता राहील.

कागदपत्रे अपलोड

ऑनलाइन अर्जासाठी उमेदवारांनी स्वतःचा फोटो फाइल आकार 80 ते 200 केबी परिणाम 200 DPI जेपीजी/जेपीईजी फॉर्मेट मध्ये 3.5 x cm 4.5 cm व फोटो 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी पूर्वीचा नसलेला फोटो अपलोड करावा.

शैक्षणिक कागदपत्रे व अनुभव प्रमाणपत्रे,जात प्रमाणपत्र,जात वैधता प्रमाणपत्र,अधिवास दाखला, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ, दिव्यांग,खेळाडू, माजी सैनिक या संदर्भातील प्रमाणपत्र व ओळख पत्र फाइल आकार 100 केबी – 2 एमबी जेपीजी/जेपीईजी पीडीएफ फॉर्मेट मध्ये अर्जसोबत अपलोड करावे लागेल.

परीक्षा शुल्क भरणे

संपूर्ण अर्ज व्यवस्थितरित्या भरून आवश्यक कागदपत्रे व दाखले आपलोड केल्यावर आवश्यक ते पदभरती परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या कलावधीत अदा करणे आवश्यक आहे त्याशिवाय अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

उमेदवारास शैक्षणिक अर्हता व अनुभवानुसार एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करता येईल.

एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज केला असल्यास त्यासाठी प्रत्येक पदाचे परीक्षा शुल्क भरावे लागेल.

परीक्षा शुल्क ऑनलाइन स्वीकारण्यात येणार आहे त्यासाठी ऑनलाइन पद्धतीनेच परीक्षा शुल्क भरा.

तुम्ही इंटरनेट बँकिंग,क्रेडिट कार्ड,डेबिट कार्ड,मोबाइल वॉलेट,कॅश कार्ड याद्वारे शुल्क भरू शकता.

परीक्षा शुल्क यशस्वीपणे पूर्ण झाले असल्याची खात्री करावी त्यानंतर अर्ज अंतिम समजला जाईल व उमेदवारांना अर्जामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.

mahasarkarnaukri group

नोकरी संदर्भात माहिती मिळवण्यासाठी दिलेल्या लोगोवर क्लिक करा व ग्रुपमध्ये जॉइन व्हा. नवनवीन नोकरी भरतीचे अपडेट पाहण्यासाठी महासरकार नोकरी ला दररोज भेट द्या.