महापारेषण अंतर्गत 130 पदांची भरती लगेच अर्ज करा | Mahatransco Bharti 2024

Mahatransco Bharti 2024

Mahatransco Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्यादित (Mahatransco) अंतर्गत सहाय्यक अभियंता रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. जाहिरातींनुसार या पदाच्या एकूण 130 जागा भरल्या जाणार असून त्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविले जात आहेत. इच्छुक व पात्र उमेवार शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज ऑनलाइन सादर करू शकतात. अर्ज दिलेल्या अधिकृत संकेत स्थळाद्वारे करता येईल.

Mahatransco Bharti 2024

सहाय्यक अभियंता या पदाचा अर्ज ऑनलाइन पद्धत्तीने करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज करता येईल,अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Mahatransco भरती साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, पदांसाठी वेतनश्रेणी, पदांची संख्या इतर सर्व आवश्यक माहिती खाली दिली आहे. या नोकरी भरतीबद्दल व पुढील विविध भरतीचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपण महासरकार नोकरीच्या व्हाट्स अँप ग्रुप ला जॉइन करा.

पदाचे नाव:
  • सहाय्यक अभियंता
एकूण पदे :
  • एकूण 130 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.
वयोमर्यादा:
  • वयोमर्यादा 57 वर्ष पर्यंत असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे. {कृपया दिलेली मूळ जाहिरात वाचावी.}
अर्ज पद्धत:
  • mahatransco भरती मध्ये अर्ज ऑनलाइन पद्धतीने अधिकृत संकेत स्थळावर करायचा आहे. खालील लिंक वर क्लिक करून थेट अर्ज करता येईल.
अर्ज फी:

सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना अर्जाची रु. 700/- फी भरावी लागेल व राखीव प्रवर्ग ईडब्ल्यूएस अनाथ उमेदवारांना अर्जाची फी रु. 350/- आहे.

महत्वाच्या दिनांक:
  • अर्ज ऑनलाइन सुरू होण्याची तारीख – 22 जानेवारी 2024 या तारखेपासून अर्ज ऑनलाइन सुरू.
  • 19 फेब्रुवारी 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक आहे.

रिक्त पदांची संख्या | Mahatransco Vacancy 2024

पदांची संख्यापदाचे नाव
130सहाय्यक अभियंता
NHIDCL No Of Posts

ऑनलाइन अर्ज याप्रकारे करा | How To Apply Maharashtra Electricity Transmission Company Limited

पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट वर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.
ऑनलाइन नोंदणी करण्याची शेवट तारीख 15 दिवस आहे.

शेवट प्राप्त झालेले किंवा नंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही त्यामुळे शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करावा भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुमची पीडीएफ जाहिरात पाहू शकता.

अर्जामध्ये चालू स्थितीतील मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी भरायचा आहे, पदासाठी संबंधित पुढील महत्त्वाचे अपडेट तुम्हाला त्यावरच कळविण्यात येतील.

अर्जासाठी लागणारी सर्व शैक्षणिक व इतर कागदपत्रे अपलोड करावी.

लागणारी शैक्षणिक पात्रता | Education Qualification For Mahatransco Recruitment 2024

शैक्षणिक पात्रतापदाचे नाव
1) इलेक्ट्रिकल इंजींनीयरिंगमध्ये डिप्लोमा धारक उमेदवार असावा.
2) इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी असावी.
सहाय्यक अभियंता

अनुभव

सहाय्यक अभियंता पदासाठी डिप्लोमा उमेदवारांनी अर्ज केल्यास 5 वर्ष पात्रतेचा अनुभव असावा व इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी तंत्रज्ञान बॅचलर पदवी पात्रतेचा उमेदवार अर्ज करीत असल्यास कोणत्याही अनुभवाची गरज नाही.

पदांकरिता वेतनश्रेणी | Salary Details For Mahatransco Jobs

वेतनश्रेणीपदाचे नाव
निवड केलेल्या उमेदवारचे वेतन MSETCL कर्मचारी सेवा नियमन 2012 मधील तरतुदींनुसार निश्चित केले जाईल. निवड झालेल्या उमेदवारास वेतन श्रेणी रु 49210-2165-60035-2280-119315सहाय्यक अभियंता

इतर भरती पहा

NCL अंतर्गत 150 रिक्त पदांची भरती

लागणारी कागदपत्रे | Required Document For Mahatransco Notification

या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार हे महाराष्ट्रचे अधिवास असले पाहिजेत,मागासप्रवर्ग आरक्षण लाभाचा दावा करणार्‍या उमेदवारांना कागदपत्रे पडतळणीच्या वेळी महाराष्ट्र शासनाच्या सक्षम प्राधिकार्‍याने दिलेले जात प्रमाणपत्र,जात वैधता प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र सादर करावे लागेल.अर्ज करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट पुढील प्रमाणे शैक्षणिक कागदपत्रे,व आधार कार्ड,ओळखीचा पुरावा उमेवराची सही व उमेवारचा पासपोर्ट आकारातील फोटो असणे गरजेचे आहे.

परीक्षा

ऑनलाइन परीक्षा दिलेल्या खलील केंद्रावर घेतली जाईल.

  1. अहमदनगर
  2. अमरावती
  3. छत्रपती संभाजीनगर
  4. जळगाव
  5. कोल्हापूर
  6. लातूर
  7. मुंबई/नवी मुंबई/ठाणे/बृहणमुंबई/ठाणे/
  8. नागपुर
  9. नांदेड
  10. नाशिक
  11. पुणे
  12. सांगली
  13. सातारा
  14. सोलापूर

परीक्षा केंद्र निवडण्यासाठी प्राधान्याचे तीन पर्याय उमेदवारांना अर्जात दिले आहेत. उमेदवारांनी योग्य केंद्राची निवड करणे आवश्यक आहे निवडलेल्या तीन पैकी कोणत्याही पसंतीच्या केंद्रातून परीक्षा केंद्र वाटप केले जाईल.एखाद्या विशिष्ट केंद्रावर ऑनलाईन लेखी परीक्षेला उमेदवारांची संख्या पुरेशी नसल्यास या उमेदवारांना इतर केंद्रावर परीक्षेसाठी उपस्थित राहायला सांगितले जाईल.

कोणत्याही केंद्रावर उमेदवारांची पुरेशी संख्या उपलब्ध नसल्यास कंपनी प्रशासकीय कारणांसाठी केंद्र जोडण्याचे हटविण्याचे बदलण्याचे अधिकार राखून ठेवते. या संदर्भात कंपनीचा निर्णय हा अंतिम असेल. परीक्षेसाठी उमेदवाराला त्यांच्या जोखमीवर स्वखर्चाने केंद्रावर परीक्षेत हजर राहावे लागेल.

ऑनलाइन लेखी परीक्षेला बसण्यासाठी सूचना :

उमेदवारांनी कंपनीच्या वेबसाईटद्वारे ऑनलाइन परीक्षेसाठी कॉल लेटर डाउनलोड करावे लागेल. त्यांचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकून ते डाउनलोड करता येईल. व ऑनलाइन लेखिपरीक्षेबाबत उमेवारांना ई-मेल व एसएमएस द्वारे सूचित करण्यात येईल. परीक्षेकरिता पोस्टाने किंवा कुरीयरद्वारे कॉललेटर पाठवले जाणार नाही.

महत्वाच्या लिंक | Important Links For Mahatransco Notification 2024

अधिकृत संकेतस्थळइथे पहा
संपूर्ण जाहिरातसंपूर्ण जाहिरात इथे पहा
ऑनलाइन अर्जअर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
Important Links

निवड प्रक्रिया | Selection Process Of Mahatransco Bharti

या भरतीच्या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची ऑनलाइन चाचणी परीक्षा होईल.

सर्व उमेदवारांना त्यांची पात्रता पडताळल्याशिवाय ऑनलाइन चाचणीसाठी बोलावले जाईल.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने खात्री करावी की ते सर्व पात्रता निकषांची पूर्तता करत आहेत.

पडताळणी प्रक्रिया दरम्यान उमेदवार पात्रता निकषांची पूर्तता करत नसल्यास नियुक्तीचा आदेश जारी केला जाणार नाही.

परीक्षा ही एकूण 150 गुणांची घेतली जाणार आहे.

परीक्षेमध्ये एकूण 130 प्रश्न असेल व त्यासाठी परीक्षेचा कालावधी हा 120 मिनिटे इतका राहील.

निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची यादी केवळ कंपनीच्या वेबसाइटवर प्रदर्शित केली जाईल.

सर्वसाधारण सूचना

जाहिरातीमध्ये नमूद असल्याप्रमाणे सर्व पात्रता निकषांची पूर्तता केल्याचे खात्री करावी.

उमेदवारांनी चुकीची किंवा खोटी माहिती किंवा प्रमाणपत्र कागदपत्रे बनावट सादर केली किंवा भौतिक माहिती दडवली असेल तर तो उमेदवार प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविला जाईल, आणि नियुक्त केलेले असल्यास कोणत्याही सूचना न देता कंपनीच्या सेवेतून काढून टाकण्यात येईल.

उमेदवाराने मराठी भाषेचे ज्ञान असलेले प्रमाणपत्र सादर करावे पुढील प्रमाणे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा मंडळ किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाचे प्रमाणपत्र माध्यमिक शालेय प्रमाणपत्र परीक्षा किंवा मराठी भाषेसह विद्यापीठाची मॅट्रिक किंवा उच्च परीक्षा उत्तीर्ण दर्शवलेले.

सदर नोकरीची व इतर नोकरीच्या संधीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप्प लोगोवर क्लिक करून महासरकारनोकरी ग्रुप जॉइन करा व नोकरी संदर्भातील जाहिरात तुमच्या मित्रांना शेअर करा.

mahasarkar Naukri
तुमच्या मित्रांना पाठवा