दहावीचा निकाल जाहीर , या लिंकवर बघा आपला निकाल.?| 10th result 2024 maharashtra board link online

Maharashtra SSC Result 2024

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10 वी 12 वी च्या निकालाबाबत अनेक प्रश्न विचारले जात होते.अखेर महाराष्ट्र राज्य मंडळाने बारावीचा निकाल 21 मे 2024 या रोजी जाहीर केला यावर्षीही नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली आहे.आता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, दहावीचा निकाल कधी लागणार याची विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये उत्सुकता आहे.

महाराष्ट्र बोर्ड 10 वी निकाल 2024

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता दहावी लेखी परीक्षेचा निकाल आज 27 मे 2024 रोजी दुपारच्या एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.
विद्यार्थ्यांना maharesult.nic.in आणि mahahsscboard.in या वेबसाईटवरून निकाल पाहता येईल. तसेच विषयनिहाय गुणांची प्रिंट घेता येणार आहे. यावर्षी दहावीच्या तोंडी परीक्षांचे गुण ऑनलाईन पद्धतीने भरून घेण्यात आले, त्यामुळे दहावीचा निकाल देखील लवकर जाहीर होत आहे.

दहावी लेखी परीक्षा 2024 :

राज्यभरातील नऊ अविभागीय मंडळाकडून दहावीच्या लेखी परीक्षा एक मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या होत्या बेस्ट ऑफ फाईव्ह सूत्राप्रमाणे निकाल जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळांमध्ये गुण पत्रकांचे वाटप केले जाईल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी 28 मे ते 11 जून या कालावधीत अर्ज करता येईल.अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेतली जाईल.

निकाल कसा पहावा.?

निकाल पाहण्यासाठी mahasscboard.in,mahresultmnicmjn,sscresult.mkcl.org या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला बैठक क्रमांक आणि आईचे नाव टाकून निकाल पाहता येणार आहे.

विद्यार्थ्यांना एसएमएसच्या माध्यमातून देखील निकाल पाहता येईल त्यासाठी तुमच्या मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये MH 10 लिहून त्यापुढे तुमचा रोल नंबर टाकून 57766 या क्रमांकावर मेसेज पाठवायचा आहे.

शिक्षण मंत्री यांनी केले अभिनंदन.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी आहे असे सांगितले तसेच, त्यांनी दहावीचा निकाल 27 मे च्या आधी लागेल असे सांगितले निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या mahahssc board.in,mahresult.nic.in msbshse.co.in या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येईल.

अतिरिक्त मिळणारे गुण रद्द.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे परीक्षेत मिळणाऱ्या अतिरिक्त गुण आता रद्द करण्यात आले आहेत कारण काही संस्थांकडून बनावट प्रमाणपत्रे मिळत असल्याचे उघड झालेले आहे. त्यामुळे 110 संस्थांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांवर आणि टक्केवारीवर परिणाम होईल.

निकाल पाहण्याकरिता.mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाऊन तुमचा सीट नंबर आणि आईचे नाव भरून निकाल पाहता येईल.

विद्यार्थ्यांनी निकाल पाहताना त्यांच्या सर्व माहितीची खातरजमा करावी.
निकाला बाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी अधिकृत संकेतस्थळ.
mahresultnic.in, mahasscboard.in, sscresultmkcl.org या लिंक वर भेट द्यावी.

महाराष्ट्र SSC निकाल 2024
  • महत्त्वाचे संकेतस्थळे.
  • mahresult.nic.in
  • mahahsscboard.in
  • sscresult.mkcl.org
निकाल ऑनलाईन तपासण्यासाठी खालील गोष्टी करा.
  1. दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  2. दहावीच्या निकालाची लिंक क्लिक करा.
  3. तुमचा बैठक क्रमांक आणि आईचे नाव भरा.
  4. सबमिट बटनावर क्लिक करा आणि निकाल पहा.
  5. तुमचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल
  6. निकालाची प्रिंट घ्या.
एसएमएसद्वारे निकाल तपासण्यासाठी :
  1. मोबाईलचा मेसेज बॉक्स मध्ये जा.
  2. MH 10 आणि समोर तुमचा रोल नंबर लिहा.
  3. 57766 या क्रमांकावर एसएमएस पाठवा निकाल एसएमएस द्वारे मिळेल.

दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक आता आणखी वाढली आहे कारण काही तासांतच त्यांचा निकाल लागणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) SSC म्हणजेच 10वी परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असेल.

निकालाची प्रक्रिया आणि अपेक्षित वेळ

निकाल जाहीर होण्याआधी सकाळी 11 वाजता निकालाबाबत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहण्यासाठी mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या वेबसाइट्सवर जाऊन आवश्यक तपशील, जसे की रोल नंबर आणि आईचे नाव, प्रविष्ट करावे लागतील. निकाल तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेचा आसन क्रमांक आणि प्रवेश पत्रावरील आईचे पहिले नाव वापरणे आवश्यक आहे. महाराष्ट्र एसएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्याने प्रत्येक विषयात किमान 35 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे, मात्र, 20 टक्के गुण मिळवणाऱ्यांनाही उत्तीर्ण मानले जाईल.

निकाल कसा पाहावा?
  • अधिकृत संकेतस्थळ mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in वर जा.
    दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा बैठक क्रमांक भरा व आईचे नाव भरा
    सबमिट बटनवर क्लिक करून निकाल पहा.
    निकालाची प्रत काढा.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च 2023 मध्ये दहावीच्या परीक्षा घेतल्या होत्या. या परीक्षेत 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यापैकी 14 लाख 34 हजार 898 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, ज्यामुळे राज्याचा एकूण निकाल 93.83 टक्के एवढा लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत 3.11 टक्क्यांनी निकालात घट झाली आहे.

निकालाच्या महत्वाच्या तारीखा
  • बारावीच्या निकालाची तारीख: 21 मे 2024
  • दहावीच्या निकालाची तारीख: 27 मे 2024
उपलब्धता आणि लिंक

निकालाची माहिती आणि थेट लिंकसाठी mahahsscboard.in, mahresult.nic.in या संकेतस्थळांना भेट द्या. अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी mahasarkarnaukri ला वेळोवेळी भेट देत रहा.

एसएससी निकालासाठी आवश्यक माहिती:

रोल नंबर
आईचे पहिले नाव
mahahsscboard.in
mahresult.nic.in

संप व निकालातील विलंब

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे निकाल विलंब होण्याची शक्यता वर्तवली होती. परंतु उत्तरपत्रिका तपासणीचे काम जलद गतीने पूर्ण होत असल्याने, निकाल वेळेत जाहीर केला जाणार आहे.

नियम बदल

यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये कठोर नियम लागू करण्यात आले होते. कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी, मोबाईल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमातून परीक्षेचा पेपर विकत घेतल्यास परीक्षा रद्द केली जाणार आणि पुढील पाच परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचे निलंबन केले जाईल.

तुमच्या मित्रांना पाठवा